Posts

अध्याय १ ला - अभंग .अर्जुन विषाद ३३३ ते ३८९************

Image
अध्याय १ ला - अभंग  .अर्जुन विषाद  ३३३ ते ३८९ ************ निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव । न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ॥३१॥ कौरवांचा वध । जरी वाटे चांग । न मारुं कां सांग । धर्मादिकां ॥३३३॥ आम्ही आप्तजन । सर्व हि निभ्रांत । एक चि ना गोत । एकमेकां ॥३३४॥ म्हणोनियां देवा । जळो जळो झुंज । माने ना हें मज । कांहीं केल्या ॥३३५॥ महा -पातकाचा । कां गा व्हावें धनी । दिसे मज हानि । सर्वस्वाची ॥३३६॥ ऐसें वाट आतां । टाळिली लढाई । तरी आशा कांहीं । कल्याणावी ॥३३७॥ न काङेक्ष विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च । किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा ॥३२॥ येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च । त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यत्वा धनानि च ॥३३॥ आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः । मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः सम्वन्धिनस्तथा ॥३४॥ देखोनि हें मज । नको नको जय । राज्य तरी काय । कशासाठीं ॥३३८॥ वधोनि हे सर्व । भोगावे जे भोग । लागो तयां आग । पार्थ बोले ॥३३९॥ ऐशा भोगाभावीं । कैसी हि आपदा । येवो तो गोविंदा । साहवेल ॥३४०॥ पुढें उभे कोण । गुरु भीष्म -द्रोण । सुखें वेचू

अध्याय १ ला - अभंग .२७७ ते ३३२ अर्जुन विषाद

Image
हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते । अर्जुन उवाच सेनयोरुयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ॥२१॥ यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् ‍ । कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् ‍ रणसमुद्यमे ॥२२॥ योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः । धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः ॥२३॥ म्हणे सर्वातून । कोणाशीं झुंजावे । लागे हें पहावें । म्हणोनियां ॥२७७॥ दोन्ही सैन्यामाजीं । नेवोनि त्वरित । देवा माझा रथ । उभा करीं ॥२७८॥ जोंवरी हे सर्व । वीर धीट धीट । क्षणभरी नीट । न्याहाळीन ॥२७९॥ बहु उतावीळ । दुष्ट हे कौरव । झुंजायाची हांव । बाळगिती ॥२८०॥ नाहीं रणीं धैर्य । नाहीं पराक्रम । आवडे संग्राम । परी ह्यांतें ॥२८१॥ रायालागीं ऐसा । सांगोनि वृत्तांत । संजय तो तेथ । काय बोले ॥२८२॥ संजय उवाच --- एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत । सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ‍ ॥२४॥ भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् ‍ । उवाच पार्थ पश्यैतान्समवेतान्कुरुनिति ॥२५॥ तत्रापश्यत्स्थितान्पार्थः पितृनथ पिता महान । आचार्यान्मातुलान्भातृन्पुत्रान्पौत्रान्सखींस्तथा ॥२६॥ श्वशुरन्सुहृदश्वैव सेनयोरुभयोरपि । तान

स्वामी स्वरूपानंद लिखित अभंग ज्ञानेश्वरी ‘अध्याय १ ला - अभंग .२०३ ते २७६ दुर्योधन बोलणे.भीष्म आणि पांडव शंख ध्वनी.युद्धभुमी वर्णन ****************

Image
दुर्योधन बोलणे.भीष्म आणि पांडव शंख ध्वनी.युद्धभुमी वर्णन  **************** अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः । भीष्ममेवाभिरक्षान्तु भवन्तः सर्व एव हि ॥११॥ सर्व सेनापती । आपुले पाहोन । पुन्हां दुर्योधन । काय बोले ॥२०३॥ म्हणे झुंजावया । सिद्ध व्हा सकळ । आपुलालें दळ । सज्ज करा ॥२०४॥ ज्यांच्यापाशीं ज्या ज्या । होती अक्षौहिणी । त्या त्या येथें रणीं । विभागाव्या ॥२०५॥ वरी अधिकारी । जो जो महारथी । तेणें तयांप्रति । आवरोनि ॥२०६॥ रहावें सर्वानी । भीष्माच्या आज्ञेंत । जाणोनि तो श्रेष्ठ । सर्वामाजीं ॥२०७॥ मग पुन्हां ऐसें । बोले द्रोणापासीं । संरक्षावें ह्यासी । तुम्ही आतां ॥२०८॥ सर्वभावें ह्यातें । माझ्या ठायीं माना । सैन्या साचपणा । ह्याच्या योगें ॥२०९॥ तस्य संजनयन्हर्ष कुरुवृद्धः पितामहः । सिंहनादं विनद्योच्चैः शडंख दध्मौ प्रतापवान ॥१२॥ ऐकोनि हे बोल। भीष्म संतोषला । मग तेणें केला । सिंहनाद ॥२१०॥ दोन्हीं दळांमाजीं । नाद तो अद्‌भुत । मावे ना नभांत । प्रतिध्वनि ॥२११॥ त्या चि प्रतिध्वनि - । सवें वीरश्रीनें । वाजविला तेणें । दिव्य शंख ॥२१२॥ मिळतां ते दोन्ही । नाद तिये काळीं । बधिरता आली ।

ॐ स्वामी स्वरूपानंद लिखित अभंग ज्ञानेश्वरी ‘अध्याय १ ला - अभंग १५१ ते२०२ दुर्योधनाचे बोलणे व सैन्य वर्णन .

Image
ॐ नमो भगवते वासुदेवाय । धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः । मामकाः पाण्डवाश्वैव किमकुर्वत संजय ॥१॥ पुसे धृतराष्ट्र । संजयालागोनि । मोहित होवोनि । पुत्र -प्रेमें ॥१५१॥ म्हणे सांगें मज । जें का धर्मालय । तेथें झालें काय । कुरु -क्षेत्रीं ॥१५२॥ जेथें ते पांडव । आणि माझे पुत्र । मिळाले एकत्र । युद्धालागीं ॥१५३॥ एवढया वेळांत । परस्परें त्यांनीं । काय केलें झणीं । सांगें मज ॥१५४॥ संजय उवाच दृष्टाव तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा । आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत ॥२॥ तिये वेळीं काय । संजय तो बोले । सैन्य उफाळलें । पांडवांचें ॥१५५॥ कल्पांताच्या वेळीं । कृतांताचें मुख । पसरावें देख । जैशा रीती ॥१५६॥ तैसें तें घनदाट । उठे एकवाट । जणूं काळकूट । उसळलें ॥१५७॥ किंवा वडवाग्नि । पेटे अकस्मात । भेटे महा -वात । तों चि त्यासी ॥१५८॥ मग त्याच्या ज्वाला । शोषोनि सागरा । झोंबाव्या अंबरा । जैशा रीती ॥१५९॥ तैसा दळ -भार । पाहतां दुर्धर । भासला भेसूर । तिये काळीं ॥१६०॥ ठाकतां सामोरा । हत्तींचा मेळावा । जैसा उपेक्षावा । सिंहराजें ॥१६१॥ तैसा नाना व्यूहीं । कोशल्यें रचिला ।

स्वामी स्वरूपानंद लिखित अभंग ज्ञानेश्वरी ‘अध्याय १ ला - अभंग ८७ते१५०गीता स्तुति .ऐकण्यातील हळुवारता.व योग्यता.

Image
स्वामी स्वरूपानंद  लिखित अभंग ज्ञानेश्वरी ‘अध्याय १ ला - अभंग ८७ते१५० गीता स्तुति .ऐकण्यातील हळुवारता.व योग्यता. ****************************** ऐका परमार्था । जी का जन्म-स्थान । सर्वा रसीं पूर्ण । जगामाजीं ॥८७॥ ऐसी सर्वोत्तम । शुद्ध अनुपम । जी का मोक्ष-धाम । अद्वितीय ॥८८॥ वैशंपायन तो । मुनि तीच कथा । सांगे नृपनाथा । जनमेजया ॥८९॥ जो का भारताचा । सुगंध-पराग । विख्यात प्रसंग । गीतानामें ॥९०॥ यादवांचा राणा । प्रभु कृष्णनाथ । संवादला जेथ । अर्जुनाशी ॥९१॥ व्यासें मंथोनिया । वेदांचा सागर । काढिलें अपार । नवनीत ॥९२॥ ज्ञानाग्नीच्या योगें । कढवितां विवेकें । पावे परिपाकें । साजूकता ॥९३॥ इच्छिती विरक्त । भोगिती जें संत । ज्ञाते रमती जेथ । सोहंभावें ॥९४॥ करावें श्रवण । जें का भक्तजनीं । जें का त्रिभुवनीं । आदिवंद्य ॥९५॥ बोलिलें तें थोर- । भारताचें सार । प्रसंगानुसार । भीष्मपर्वी ॥९६॥ वाखाणिती ज्यास । शिव-ब्रह्मदेव । भगवद्भीता नांव । सुविख्यात ॥९७॥ सेविती जें नित्य । सनकादिक मुनी । विनम्र होवोनि । अत्यादरें ॥९८॥ ऐकण्यातील हळुवारता. शरद्‌ ऋतूमाजीं । चंद्रकलेंतील । कण जे कोमल । अमृताचे ॥९

स्वामी स्वरूपानंद लिखित अभंग ज्ञानेश्वरी ‘अध्याय १ ला - अभंग १११ते१५० ज्ञानदेवांची विनम्रता

Image
ज्ञानदेवांची विनम्रता *****:::::: तुमचें हृदय । सखोल म्हणोनि । पायीं विनवणी । सलगीची ही ॥१११॥ ऐकोनियां जैसा । बालकाचा बोल । प्रेमें येई डोल । मायबापां ॥११२॥ तैसा तुम्हीं मातें । आपुला लेखिला । अंगीकार केला । संतजनीं ॥११३॥ म्हणोनि जें उणें । साहाल तें सुखें । कासया हें मुखें । विनवावें ॥११४॥ परी आगळीक । आणिक ती येथ । पाहें मी गीतार्थ । कवळाया ॥११५॥ ऐका प्रभो तुम्हां । संत श्रोते जनां । करितों प्रार्थना । ह्या चि लागीं ॥११६॥ हें तों अनावर । न झाला विचार । वायां चि हा धीर । केला येथें ॥११७॥ नाहीं तरी देखा । प्रकाशतां सूर्य । काजव्याची काय । शोभा तेथें ॥११८॥ किंवा र्चोचीनें च । अब्धि आटवाया । प्रवर्तली वायां । टिटवी जैसी ॥११९॥ नेणता मी तैसा । असोनि सर्वथा । सांगाया गीतार्था । सिद्ध झालों ॥१२०॥ ऐका आकाशातें । कवळूं पहावें । तरी मोठें व्हावें । त्याहुनी हि ॥१२१॥ म्हणोनि हें माझ्या । योग्यतेबाहेर । आघवें साचार । पाहूं जातां ॥१२२॥ अहो गीतार्थाचें । काय थोरपण । स्वयें विवरुन । दावी शंभु ॥१२३॥ जेथ ती भवानी । पावोनि आश्चर्य । विचारितां काय । बोले तिज ॥१२४॥ देवी तुझें रुप । नाकळे गे जै

स्वामी स्वरूपानंद लिखित अभंग ज्ञानेश्वरी ‘अध्याय १ ला - अभंग ५५ते८६ महाभारतकथा स्तुति

Image
महाभारतकथा स्तुति ***** आतां सावधान । ऐका श्रोतेजन । कथा जी गहन । भारताची ॥५५॥ विवेक-वृक्षांचे । अपूर्व उद्यान । कौतुकांची खाण । सकल हि ॥५६॥ सर्व सुखांचे जी । असे जन्म-स्थान । कीं महा-निधान । प्रमेयांचें ॥५७॥ नऊ हि रसांचा । परिपूर्ण देखा । सुधा-सिंधु जी का । रसाळत्वें ॥५८॥ सर्व विद्यांचें जी । असे मूळस्थान । मोक्षाचें निधान । प्रकटलें ॥५९॥ किंवा जी का सर्व । शास्त्रांची आधार । धर्माचें माहेर । सकलहि ॥६०॥ शारदेच्या शोभा- । रत्नांचे भांडार । नातरी जिव्हार । सज्जनांचें ॥६१॥ किंवा महाबुद्धी । माजीं व्यासांचिया । देखा स्फुरोनियां । सरस्वती ॥६२॥ त्रिलोकामाझारीं । जाहली प्रकट । ऐशा सर्वश्रेष्ठ । कथारुपें ॥६३॥ काव्यराज नांव । म्हणोनि ह्या ग्रंथा । रसां रसाळता । येथोनी च ॥६४॥ पावली शब्दश्रे । येथें सत्‍-शास्त्रता । वाढली मृदुता । महा-बोधीं ॥६५॥ चातुर्य तें येथें । शाहणें जाहलें । प्रमेय नटलें । गोडपणें ॥६६॥ सुखाचें सौभाग्य । पोसलें ह्या ठायीं । थोरपणा येई । उचितासी ॥६७॥ येथें माधुरीसी । आली मधुरता । तेविं सुरेखता । शृंगारासी ॥६८॥ कलेसी कौशल्य । प्राप्त झालें भलें । पुण्या तेज आलें ।