स्वामी स्वरूपानंद लिखित अभंग ज्ञानेश्वरी ‘अध्याय १ ला - अभंग ४२ ते५४माता शारदा व सद्गुरू नमन

स्वामी स्वरूपानंद  लिखित अभंग ज्ञानेश्वरी ‘
अध्याय १ ला - अभंग ४२ ते ५४
माता शारदा व सद्गुरू नमन 
****
आतां वंदितसें । देव शारदेस जिचा वाग्विलास । नित्य नवा ॥४२॥
चातुर्य-वागर्थ-। कलेची स्वामिनी । विश्वासी मोहिनी । घालिते जी ॥४३॥
भवार्णवीं जेणें । तारियलें मज । तो श्रीगुरुराज । हृदयीं माझ्या ॥४४॥
म्हणोनियां प्रेम । वाटतसे फार । मज सारासार- । विचाराचें ॥४५॥
पायाळूच्या डोळां । घालितां अंजन । पाहूं शके धन । भूमिगत ॥४६॥
किंवा चिंतामणि । होतां हस्तगत । सर्व मनोरथ । सदा पूर्ण ॥४७॥
ज्ञानदेव म्हणे । तैसा पूर्णकाम । झालों घेतां नाम । जाणत्यानें ॥४८॥
म्हणोनियां भावें । गुरु-नाम घ्यावें । कृतकृत्य व्हावें । जाणत्यानें ॥४९॥
वृक्षाचिया मूळीं । घालितां उदक । देखा शाखादिक । संतोषती ॥५०॥
किंवा भावें होतां । सागरीं सुस्नात । जैसीं घडतात । सर्व तीर्थे ॥५१॥
अमृताची गोडी । चाखिली जयानें । सेविले तयानें । सर्व रस ॥५२॥
तैसा भक्तिभावें । मियां वारंवार । केला नमस्कार । श्रीगुरुसी ॥५३।
इच्छावें जें मनें । तें तें यथारुचि । पुरविता तो चि । म्हणोनियां ॥५४॥
***********

Comments

Popular posts from this blog

अध्याय १ ला - अभंग .अर्जुन विषाद ३३३ ते ३८९************

स्वामी स्वरूपानंद लिखित अभंग ज्ञानेश्वरी ‘अध्याय १ ला - अभंग ८७ते१५०गीता स्तुति .ऐकण्यातील हळुवारता.व योग्यता.

स्वामी स्वरूपानंद लिखित अभंग ज्ञानेश्वरी ‘अध्याय १ ला - अभंग .२०३ ते २७६ दुर्योधन बोलणे.भीष्म आणि पांडव शंख ध्वनी.युद्धभुमी वर्णन ****************