Posts

Showing posts from September, 2020

ॐ स्वामी स्वरूपानंद लिखित अभंग ज्ञानेश्वरी ‘अध्याय १ ला - अभंग १५१ ते२०२ दुर्योधनाचे बोलणे व सैन्य वर्णन .

Image
ॐ नमो भगवते वासुदेवाय । धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः । मामकाः पाण्डवाश्वैव किमकुर्वत संजय ॥१॥ पुसे धृतराष्ट्र । संजयालागोनि । मोहित होवोनि । पुत्र -प्रेमें ॥१५१॥ म्हणे सांगें मज । जें का धर्मालय । तेथें झालें काय । कुरु -क्षेत्रीं ॥१५२॥ जेथें ते पांडव । आणि माझे पुत्र । मिळाले एकत्र । युद्धालागीं ॥१५३॥ एवढया वेळांत । परस्परें त्यांनीं । काय केलें झणीं । सांगें मज ॥१५४॥ संजय उवाच दृष्टाव तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा । आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत ॥२॥ तिये वेळीं काय । संजय तो बोले । सैन्य उफाळलें । पांडवांचें ॥१५५॥ कल्पांताच्या वेळीं । कृतांताचें मुख । पसरावें देख । जैशा रीती ॥१५६॥ तैसें तें घनदाट । उठे एकवाट । जणूं काळकूट । उसळलें ॥१५७॥ किंवा वडवाग्नि । पेटे अकस्मात । भेटे महा -वात । तों चि त्यासी ॥१५८॥ मग त्याच्या ज्वाला । शोषोनि सागरा । झोंबाव्या अंबरा । जैशा रीती ॥१५९॥ तैसा दळ -भार । पाहतां दुर्धर । भासला भेसूर । तिये काळीं ॥१६०॥ ठाकतां सामोरा । हत्तींचा मेळावा । जैसा उपेक्षावा । सिंहराजें ॥१६१॥ तैसा नाना व्यूहीं । कोशल्यें रचिला ।

स्वामी स्वरूपानंद लिखित अभंग ज्ञानेश्वरी ‘अध्याय १ ला - अभंग ८७ते१५०गीता स्तुति .ऐकण्यातील हळुवारता.व योग्यता.

Image
स्वामी स्वरूपानंद  लिखित अभंग ज्ञानेश्वरी ‘अध्याय १ ला - अभंग ८७ते१५० गीता स्तुति .ऐकण्यातील हळुवारता.व योग्यता. ****************************** ऐका परमार्था । जी का जन्म-स्थान । सर्वा रसीं पूर्ण । जगामाजीं ॥८७॥ ऐसी सर्वोत्तम । शुद्ध अनुपम । जी का मोक्ष-धाम । अद्वितीय ॥८८॥ वैशंपायन तो । मुनि तीच कथा । सांगे नृपनाथा । जनमेजया ॥८९॥ जो का भारताचा । सुगंध-पराग । विख्यात प्रसंग । गीतानामें ॥९०॥ यादवांचा राणा । प्रभु कृष्णनाथ । संवादला जेथ । अर्जुनाशी ॥९१॥ व्यासें मंथोनिया । वेदांचा सागर । काढिलें अपार । नवनीत ॥९२॥ ज्ञानाग्नीच्या योगें । कढवितां विवेकें । पावे परिपाकें । साजूकता ॥९३॥ इच्छिती विरक्त । भोगिती जें संत । ज्ञाते रमती जेथ । सोहंभावें ॥९४॥ करावें श्रवण । जें का भक्तजनीं । जें का त्रिभुवनीं । आदिवंद्य ॥९५॥ बोलिलें तें थोर- । भारताचें सार । प्रसंगानुसार । भीष्मपर्वी ॥९६॥ वाखाणिती ज्यास । शिव-ब्रह्मदेव । भगवद्भीता नांव । सुविख्यात ॥९७॥ सेविती जें नित्य । सनकादिक मुनी । विनम्र होवोनि । अत्यादरें ॥९८॥ ऐकण्यातील हळुवारता. शरद्‌ ऋतूमाजीं । चंद्रकलेंतील । कण जे कोमल । अमृताचे ॥९

स्वामी स्वरूपानंद लिखित अभंग ज्ञानेश्वरी ‘अध्याय १ ला - अभंग १११ते१५० ज्ञानदेवांची विनम्रता

Image
ज्ञानदेवांची विनम्रता *****:::::: तुमचें हृदय । सखोल म्हणोनि । पायीं विनवणी । सलगीची ही ॥१११॥ ऐकोनियां जैसा । बालकाचा बोल । प्रेमें येई डोल । मायबापां ॥११२॥ तैसा तुम्हीं मातें । आपुला लेखिला । अंगीकार केला । संतजनीं ॥११३॥ म्हणोनि जें उणें । साहाल तें सुखें । कासया हें मुखें । विनवावें ॥११४॥ परी आगळीक । आणिक ती येथ । पाहें मी गीतार्थ । कवळाया ॥११५॥ ऐका प्रभो तुम्हां । संत श्रोते जनां । करितों प्रार्थना । ह्या चि लागीं ॥११६॥ हें तों अनावर । न झाला विचार । वायां चि हा धीर । केला येथें ॥११७॥ नाहीं तरी देखा । प्रकाशतां सूर्य । काजव्याची काय । शोभा तेथें ॥११८॥ किंवा र्चोचीनें च । अब्धि आटवाया । प्रवर्तली वायां । टिटवी जैसी ॥११९॥ नेणता मी तैसा । असोनि सर्वथा । सांगाया गीतार्था । सिद्ध झालों ॥१२०॥ ऐका आकाशातें । कवळूं पहावें । तरी मोठें व्हावें । त्याहुनी हि ॥१२१॥ म्हणोनि हें माझ्या । योग्यतेबाहेर । आघवें साचार । पाहूं जातां ॥१२२॥ अहो गीतार्थाचें । काय थोरपण । स्वयें विवरुन । दावी शंभु ॥१२३॥ जेथ ती भवानी । पावोनि आश्चर्य । विचारितां काय । बोले तिज ॥१२४॥ देवी तुझें रुप । नाकळे गे जै

स्वामी स्वरूपानंद लिखित अभंग ज्ञानेश्वरी ‘अध्याय १ ला - अभंग ५५ते८६ महाभारतकथा स्तुति

Image
महाभारतकथा स्तुति ***** आतां सावधान । ऐका श्रोतेजन । कथा जी गहन । भारताची ॥५५॥ विवेक-वृक्षांचे । अपूर्व उद्यान । कौतुकांची खाण । सकल हि ॥५६॥ सर्व सुखांचे जी । असे जन्म-स्थान । कीं महा-निधान । प्रमेयांचें ॥५७॥ नऊ हि रसांचा । परिपूर्ण देखा । सुधा-सिंधु जी का । रसाळत्वें ॥५८॥ सर्व विद्यांचें जी । असे मूळस्थान । मोक्षाचें निधान । प्रकटलें ॥५९॥ किंवा जी का सर्व । शास्त्रांची आधार । धर्माचें माहेर । सकलहि ॥६०॥ शारदेच्या शोभा- । रत्नांचे भांडार । नातरी जिव्हार । सज्जनांचें ॥६१॥ किंवा महाबुद्धी । माजीं व्यासांचिया । देखा स्फुरोनियां । सरस्वती ॥६२॥ त्रिलोकामाझारीं । जाहली प्रकट । ऐशा सर्वश्रेष्ठ । कथारुपें ॥६३॥ काव्यराज नांव । म्हणोनि ह्या ग्रंथा । रसां रसाळता । येथोनी च ॥६४॥ पावली शब्दश्रे । येथें सत्‍-शास्त्रता । वाढली मृदुता । महा-बोधीं ॥६५॥ चातुर्य तें येथें । शाहणें जाहलें । प्रमेय नटलें । गोडपणें ॥६६॥ सुखाचें सौभाग्य । पोसलें ह्या ठायीं । थोरपणा येई । उचितासी ॥६७॥ येथें माधुरीसी । आली मधुरता । तेविं सुरेखता । शृंगारासी ॥६८॥ कलेसी कौशल्य । प्राप्त झालें भलें । पुण्या तेज आलें ।

स्वामी स्वरूपानंद लिखित अभंग ज्ञानेश्वरी ‘अध्याय १ ला - अभंग ४२ ते५४माता शारदा व सद्गुरू नमन

Image
स्वामी स्वरूपानंद  लिखित अभंग ज्ञानेश्वरी ‘ अध्याय १ ला - अभंग ४२ ते ५४ माता शारदा व सद्गुरू नमन  **** आतां वंदितसें । देव शारदेस जिचा वाग्विलास । नित्य नवा ॥४२॥ चातुर्य-वागर्थ-। कलेची स्वामिनी । विश्वासी मोहिनी । घालिते जी ॥४३॥ भवार्णवीं जेणें । तारियलें मज । तो श्रीगुरुराज । हृदयीं माझ्या ॥४४॥ म्हणोनियां प्रेम । वाटतसे फार । मज सारासार- । विचाराचें ॥४५॥ पायाळूच्या डोळां । घालितां अंजन । पाहूं शके धन । भूमिगत ॥४६॥ किंवा चिंतामणि । होतां हस्तगत । सर्व मनोरथ । सदा पूर्ण ॥४७॥ ज्ञानदेव म्हणे । तैसा पूर्णकाम । झालों घेतां नाम । जाणत्यानें ॥४८॥ म्हणोनियां भावें । गुरु-नाम घ्यावें । कृतकृत्य व्हावें । जाणत्यानें ॥४९॥ वृक्षाचिया मूळीं । घालितां उदक । देखा शाखादिक । संतोषती ॥५०॥ किंवा भावें होतां । सागरीं सुस्नात । जैसीं घडतात । सर्व तीर्थे ॥५१॥ अमृताची गोडी । चाखिली जयानें । सेविले तयानें । सर्व रस ॥५२॥ तैसा भक्तिभावें । मियां वारंवार । केला नमस्कार । श्रीगुरुसी ॥५३। इच्छावें जें मनें । तें तें यथारुचि । पुरविता तो चि । म्हणोनियां ॥५४॥ ***********

अभंग १ ते४१ ॐ कार स्वरूप श्री गणेशाचे वर्णन

Image
  स्वामी स्वरूपानंद  लिखित अभंग ज्ञानेश्वरी ‘ अध्याय १ ला - अभंग १ ते४१ ॐ कार स्वरूप श्री गणेशाचे वर्णन ******** आत्मरुपा तुज । करीं नमस्कार । तुझा जयजयकार । असो देवा ॥१॥ ॐकारस्वरुपा । तूं चि सर्वा मूळ । व्यापोनि सकळ । राहिलासी ॥२॥ सर्व सर्वातीत । तूं चि सर्वात्मक । विषय तूं एक । वेदांलागीं ॥३॥ ‘नेति नेति’ ऐसें । बोलती ते वेद । स्वरुप अगाध । तुझें देवा ॥४॥ जाणावयाजोगा । आपणा आपण । म्हणोनियां मौन । वेदांसी हि ॥५॥ आत्मरुपा देवा । तूं चि गणाधीश । बुद्धीचा प्रकाश । सकलांच्या ॥६॥ आतां ऐका ऐसें । म्हणे श्रोतयांस । निवृत्तीचा दास । ज्ञानदेव ॥७॥ पूर्ण शब्दब्रह्म । गणेशासी मूर्ति । सजलीसे किती । मनोरम ॥८॥ वर्णरुप शोभे । शरीर निर्मळ । सौंदर्य सोज्ज्वळ । खुले तेथें ॥९॥ कैसी रसपूर्ण । देहाची ठेवण । प्रकटली खाण । लावण्याची ॥१०॥ वेगळाल्या स्मृती । ते चि अवयव । सौंदर्याची ठेव । अर्थ-शोभा ॥११॥ अठरा पुराणें । शोभती साचार । जणूं अलंकार । रत्नमय ॥१२॥ वेंचोनियां नाना । प्रमेयांचे मणी । पद्याचे कोंदणीं । बैसविलें ॥१३॥ सहज सुंदर । शब्दांची रचना । वस्त्र तें चि जाणा । रंगदार ॥१४॥ साहित्याचा धागा । नाजूक अत्य